हलगा गावात रंगली आगळीवेगळी "होम मिनिस्टर स्पर्धा 2025"
– मनोरंजनातून प्रबोधन, मानाची पैठणी जिंकली सौ.राणी प्रसाद तारीहाळकर
बेळगाव (शिवसंदेश न्यूज ): सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, धर्मवीर संभाजी चौक, लक्ष्मी गल्ली हालगा यांच्या वतीने आयोजित "होम मिनिस्टर स्पर्धा 2025" हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. "मनोरंजनातून प्रबोधन" हा मुख्य गाभा असलेल्या या स्पर्धेत १०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाला रंगत आणली.
होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या -
प्रथम क्रमांक (मानाची पैठणी): सौ. राणी प्रसाद तारीहाळकर
द्वितीय क्रमांक (प्रेशर कुकर): सुप्रिया आनंद पुन्नाजी
तृतीय क्रमांक (आरती सेट): सौ. रेखा कामती
चतुर्थ क्रमांक (साडी): सौ. पूजा पुन्नाजी
पाचवा क्रमांक (स्टील कळशी): सौ. जयश्री बिळगोजी
कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये या स्पर्धेत सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा व उखाणे बरोबर तळ्यात - मळ्यात ,लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, फुगे फोडणे, मनोरा रचना, चिमटे अडकवणे, बिस्कीट खाणे, टिकली लावणे , बाटलीत पाणी भरणे व नृत्य अशा दहा-बारा मजेदार खेळांचा समावेश होता. महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व निखळ आनंद लुटला.
भारदस्त व रोचक सूत्रसंचालन रवींद्र पाटील सर व संजय साबळे सर यांनी केले. त्यांच्या रसाळ व विनोदी निवेदनामुळे संपूर्ण वातावरण हशा, टाळ्या व उत्साहाने भरून गेले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी महिलांना प्रबोधनात्मक संदेश देत नारीशक्तीचा गौरव केला तसेच पाल्यांच्या शिक्षणाविषयीही प्रेरणादायी विचार मांडले.यांच्या रसाळ व विनोदी निवेदनामुळे संपूर्ण वातावरण हशा, टाळ्या आणि उत्साहाने उजळलं.मनोरंजन, प्रबोधन, प्रेरणा आणि निखळ आनंद - सगळं एका मंचावर! अनुभवाता आलं .
"मनोरंजनातून प्रबोधन" या संकल्पनेतून पार पडलेली ही स्पर्धा महिलांना निखळ आनंद देतानाच आत्मविश्वास, समाजातील सहभाग आणि संस्कार यांचा संदेश देणारी ठरली. हा उपक्रम हलगा गावातील संस्कृती, सामाजिक एकोपा व उत्साहाचे प्रतीक ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या स्पर्धेच्या मुख्य प्रायोजक ग्रामपंचायत उपाध्यक्ष व CAC कमिटीच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मी आनंद संताजी होत्या. सहप्रायोजक म्हणून सागर बिळगोजी, मनोहर संताजी, अनिल शिंदे, संभाजी हनुमंताचे व किरण मर्याकाच्चे यांनी योगदान दिले. विजेत्यांना श्री. योगेश शिंदे (प्रोप्रा. श्री रेणुका ऑटो गॅरेज) यांनी ट्रॉफी दिल्या. तसेच प्रायोजकांचा गौरव श्री. अनिल शिंदे यांनी स्मृतीचिन्ह देऊन केला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मासमर्डी, प्रमोद पुन्नाजी, आप्पाजी शिंदे, प्रवीण सुळगेकर, प्रदीप बिळगोजी, नागेंद्र पुन्नाजी, बाळू शिंदे, विनायक शिंदे, शुभम तारीहाळकर यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Post a Comment
0 Comments