बेळगाव मराठा समाजाला आवाहन
सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण २०२५ मध्ये ‘मराठा-कुणबी, मातृभाषा मराठी’ नोंदवावी
बेळगाव ( शिवसंदेश न्यूज ) :कर्नाटक सरकार कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने होणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण २०२५ संदर्भात क्षत्रिय मराठा परिषद समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आज एकदंत सोसायटी येथे पार पडली.
या बैठकीस क्षत्रिय मराठा परिषद व बेळगाव जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रमुख तसेच समाजनेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत सविस्तर चर्चा करून एकमताने ठराव करण्यात आला की, सर्वेक्षण फॉर्म भरताना प्रत्येकाने खालील बाबींची नोंद बंधनकारकपणे करावी :
धर्म : हिंदू
जात : मराठा
पोटजात : कुणबी
मातृभाषा : मराठी (कन्नड शिकले असले तरी मातृभाषा मराठीच नमूद करावी)
क्षत्रिय कर्नाटक मराठा परिषद, बेंगळुरू व सकल मराठा-क्षत्रिय मराठा परिषद, बेळगाव यांनी घेतलेली ही भूमिका संपूर्ण समाजाने एकसमानपणे स्वीकारावी, असे बैठकीत ठरले.
बैठकीस पुढील मान्यवर उपस्थित होते :
दिलीप पवार (जिल्हा उपाध्यक्ष), डी. बी. पाटील (अध्यक्ष, बेलगाव ग्रामीण), संजीव भोसले (जिल्हा सचिव), सतीश बाचिकर (अध्यक्ष, बेलगाव दक्षिण), बसवराज नायगोती (अध्यक्ष, बेलगाव ग्रामीण पूर्व), अॅड. एस. एस. मोरे, कॅप्टन चंगप्पा पाटील, बी. एच. बिलगोगी व आर. एच. जाधव.
📌 विशेष सूचना :
घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून सकल मराठा समाजातील प्रत्येक बंधू-भगिनींनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले.

Post a Comment
0 Comments