Type Here to Get Search Results !

चंदगडचा मान उंचावणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार आनंद पाटील यांना जाहीर

 चंदगडचा मान उंचावणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार ' आनंद पाटील यांना जाहीर

ज्ञानदीपवत व्यक्तिमत्त्वाचा सन्मान


चंदगड : शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित करणारे आणि समाजकार्यात नेहमीच आघाडीवर असणारे मा. श्री. आनंद कल्लापा पाटील, मुख्याध्यापक – श्री दत्त हायस्कूल, राजगोळी बु. यांना चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. 

 

५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जाहीर झालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या अखंड परिश्रमांना व सेवाभावी वृत्तीला मिळालेला मोलाचा मानाचा मुजरा ठरला आहे.


यापूर्वी पाटील सरांना

२०१७-१८ साली एम.एस.सी.ई.आर.टी. पुणे तर्फे प्रशिक्षण प्रमाणपत्र,

 २०२० साली कोरोना योद्धा म्हणून सन्मान,

 २०२१-२२ मध्ये आदर्श गुरुवर्य पुरस्कार,

 २०२३-२४ मध्ये National Rural Development Foundation कडून आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार,

अशा अनेक मानांनी गौरविण्यात आले आहे.


चंदगड तालुका मुख्याध्यापक संघाचे खजिनदार म्हणून कार्यरत असलेले पाटील सर गावातील विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमातही नेहमीच अग्रेसर असतात.


त्यांच्या या नव्या सन्मानामुळे संपूर्ण चंदगड तालुका आणि राजगोळीची धरती अभिमानाने उजळली आहे.

Post a Comment

0 Comments