Type Here to Get Search Results !

कुद्रेमानी येथे श्री महालक्ष्मी दुर्गामाता युवक मंडळाचा दुर्गामाता मिरवणूक जल्लोषात

 कुद्रेमानी येथे श्री महालक्ष्मी दुर्गामाता युवक मंडळाचा दुर्गामाता मिरवणूक जल्लोषात 


कुद्रेमानी (शिवसंदेश न्यूज) :श्री महालक्ष्मी दुर्गामाता युवक मंडळ, कुद्रेमाणी यांच्या वतीने दुर्गामाता उत्सवाची सुरुवात भक्तिभावाने झाली. मूर्तीची देणगी मनोहर भुजंग लोहार व लता मनोहर लोहार यांनी दिली . 


मिरवणुकीत सोनाली गावच्या भजन मंडळाने टाळ, मृदंग व वीणेच्या गजरात भक्तिमय वातावरण रंगवले. गावातील भाविकांनी मोठ्या श्रद्धाभावाने मिरवणुकीत सहभाग नोंदवला.


उत्सवाच्या दहा दिवसांत भजन, हरिपाठ, ठिपऱ्या, नृत्यस्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


या उत्सवाचे आयोजन अंकुश मारुती सुतार व सोनम अंकुश सुतार, निलेश शंकर पाटील यासह  गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिकच भव्यदिव्य झाले असून, "सामाजिक प्रबोधनासोबत मनोरंजन" हा हेतू ठेवून कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख अंकुश सुतार यांनी दिली.


Post a Comment

0 Comments