चंदगड पंचायत समिती तर्फे 'गुणगौरव' सोहळा उत्साहात संपन्न
चंदगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने पंचायत समिती चंदगड आयोजित 'गुणगौरव' सोहळा आमदार शिवाजी पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात उत्कृष्ट शाळा, आदर्श शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या देशाची भावी पिढी घडविण्याचे पवित्र कार्य शाळा व शिक्षक करत असून ग्रामीण भागातील अनेक अडचणींवर मात करीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणं ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार शिवाजी पाटील यांनी यावेळी केले. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पाठीवर कौतुकाची थाप देऊन आणखी यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तडशिनहाळ, औरनाळ, कलिवडे आदी शाळांनी जिल्हा तसेच राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली असून, चंदगड विधानसभा मतदारसंघातील शिक्षण क्षेत्रात सातत्याने चांगली सुधारणा होत असल्याचे समाधान असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
या कार्यक्रमाला मा. सौ. मिना शेंडकर (शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग), मा. वृषाली यादव (गटविकास अधिकारी, चंदगड), श्री. वैभव पाटील (गट शिक्षणाधिकारी) यांच्यासह मा. अनिकेत चराटी, मा. अशोक कदम, मा. अशोक गडदे, मा. अमर नाईक, मा. चंद्रकांत किरमटे, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments