मोर्ले–मिरवेल रस्त्यास वनविभागाची अंतिम मंजुरी- आमदार शिवाजी पाटील
चंदगड (प्रतिनिधी): गेली सात वर्षे प्रलंबित असलेल्या मोर्ले–मिरवेल रस्त्यास अखेर वनविभागाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी या रस्त्यासाठी 2019 पासून सातत्याने पाठपुरावा केला होता.
आ. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून या मार्गाचे महत्त्व अधोरेखित केले होते. गेल्या आठ महिन्यांत त्यांनी या विषयावर अधिक जोमाने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मोर्ले–मिरवेल मार्गासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे.
या मार्गामुळे चंदगड तालुका सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्याशी थेट जोडला जाणार आहे. तिलारी घाटासाठी हा एक पर्यायी मार्ग ठरणार असून वाहतूक अधिक सुलभ व जलदगतीने होणार आहे. व्यापार, दळणवळण व विकासाच्या दृष्टीने या रस्त्याचा लाभ संपूर्ण तालुक्याला होणार आहे.
या प्रलंबित प्रश्नाला दिलासा मिळाल्याने स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
.jpeg)
Post a Comment
0 Comments