विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या आनंद पाटील यांना ‘आदर्श शिक्षक ' पुरस्काराने गौरव
चंदगड :दत्त हायस्कूल, राजगोळीचे मुख्याध्यापक आनंद पाटील यांना चंदगड मराठी अध्यापक संघातर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून २०२५ सालचा “आदर्श शिक्षक पुरस्कार” शिक्षक दिनानिमित्त प्रदान करण्यात आला.
मराठी विद्या मंदिर, राजगोळी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल देऊन सपत्नीक त्यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान शिवराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. के. पाटील यांनी भूषविले.
प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी केले.
“शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदीप प्रज्वलित करणारे आणि समाजकार्यात सदैव अग्रेसर असणारे अनंत पाटील सर हे खर्या अर्थाने आदर्श शिक्षक आहेत,” अशा गौरवोद्गारांनी अध्यक्ष बी. के. पाटील यांनी सरांचा गौरव केला.
यावेळी एम. एन. शिवणगेकर, राघवेंद्र इनामदार, रविंद्र पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष बी. के. पाटील, मुख्याध्यापक मारुती राजगोळे, पोमाणी पाटील, शिवाजी बिर्जे, अर्जुन गुरव, यशवंत कांबळे, जानबा गुरव, संजय साबळे, बी. एन. पाटील, कमलेश कर्निक, राजेंद्र शिवणगेकर , एच आर पाऊसकर , व्ही एल सुतार ,प्रताप नागेनट्टी यांसह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. गुरव व एस. पी. पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. सुरेखा पाटील यांनी मानले.

Post a Comment
0 Comments