राकसकोप येथे सावित्री मोरे यांचा शताब्दी महोत्सव — ‘ग्रंथतुला’ थाटात साजरा!
'ग्रंथतुला ' चार पिढ्यांचा एकत्र सोहळा ; शाळांना ग्रंथभेट
राकसकोप (प्रतिनिधी):“आई हेच दैवत, आणि तिचं आयुष्य हेच प्रेरणागीत!” — या भावनेने राकसकोप येथे मातोश्री सावित्री रुक्माण्णा मोरे यांचा ९४ वा वाढदिवस आणि शताब्दी महोत्सव अत्यंत भक्तिमय, संस्कारपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी धन्वंतरी यज्ञ, सत्यनारायण पूजा, धान्यतुला आणि ‘ग्रंथतुला’ अशा विविध शास्त्रोक्त विधींचं आयोजन करण्यात आलं. संपूर्ण मोरे परिवारासह आप्तेष्ट व गावातील मान्यवर यांच्या उपस्थितीत वातावरण आनंद, कृतज्ञता आणि मातृत्वाच्या भावनेनं ओथंबून गेलं.
चारही पिढ्यांची एकत्र साक्षी — मामा, मावशी, मुले, सुना, नातवंडे आणि पणतवंडे — या कुटुंबबंधांच्या सुवासिक क्षणी, परंपरा आणि संस्कारांची साखळी जणू नव्या तेजानं उजळली.ग्रंथ तुला करून विचाराचा दान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन पहिल्यांदाच राकसकोप येथे शिवसंत संजय मोरे ( संचालक ,यश ॲटो शोरूम, कॉलेज रोड बेळगाव ) तसेच श्री. रामचंद्र मोरे, श्री.अरुण मोरे आणि सौ. मंजुळा ढेगसकर यांच्या वतीने करण्यात आले. मातृ संस्काराचा सोहळा आज समाजात आदर्शवत आहे . कारण वृद्धाश्रमाची वाढती संख्या ही समाज मनाची चिंता वाढविणारी आहे . जगातल्या प्रत्येक यशाचं मूळ — आईच्या आशीर्वादात आहे! - शिवसंत संजय मोरे
या प्रसंगी उद्योगपती महादेव चौगुले, ईश्वर लगाडे, अजित यादव, ॲड. सुधीर चव्हाण, रणजित चौगुले, एल. पी. पाटील, अंकुश बेळवटकर, एम. के. पाटील, राजू झाजरी आणि निंगाप्पा मोरे , मिनाक्षी शशिधर तोडकर धारवाड ) , ज्योती प्रमोद जाधव (पुणे) ,रिलस्टार मानसी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच मामा गुंडू कलजी, कल्लाप्पा कलजी (तुडये ) ,मावशी प्रिती पाटील (तुडये ) , मावशी आनंदी पाटील (कुद्रेमानी ), अनु कटांबळे (कडोली), धोडिबा पाटील-इनामदार (धुमडेवाडी), एम वाय घाडी,जेलर उत्तम पाटील, सुभेदार धनाजी मोरे ,डी. बी. पाटील, सुभेदार के. आर. मोटर, संजय गुरव, राहुल मोरे, अभय मोरे, शरद मोरे, अजित मोरे, विनायक मोरे आणि नागेश ढेगसकर , दिनेश ढेगसकर यांचीही उपस्थिती लाभली.
📚 विशेष म्हणजे, ‘ग्रंथतुला’मधील सर्व ग्रंथ स्थानिक प्राथमिक व हायस्कूल शाळांना भेट देण्यात आले, ज्यातून वाचनसंस्कृतीला चालना आणि ज्ञानसंस्कारांची बीजे रोवण्याचा संदेश दिला गेला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले.
![]() |
| चार पिढ्यांनी आजीला दिल्या दीर्घायुषी शुभेच्छा ! |
चार पिढ्यांच्या साक्षीने साजरा झालेला हा ‘ग्रंथतुला’ सोहळा — मातृत्व, संस्कार आणि साहित्यातील सोन्याचा अध्याय ठरला!




Post a Comment
0 Comments