Type Here to Get Search Results !

उमगावात टस्कर हत्तींचा धुमाकूळ — शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठे नुकसान!

 🌾 उमगावात टस्कर हत्तींचा धुमाकूळ — शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठे नुकसान! 🌾



चंदगड / प्रतिनिधी :चंदगड तालुक्यातील उमगाव परिसरात टस्कर हत्तींच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात हत्ती व रानटी प्राण्यांकडून भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. यामुळे कापणीअवघ्या काही दिवसांवर असताना शेतकऱ्यांचे सर्वस्व उद्‌ध्वस्त झाले आहे.


टोपा रामा गावडे, गोविंद दत्तू गावडेझळ, गोपाळ दत्तू गावडे, सावित्री शिवाजी गावडे, अर्जुन बारकू रेडकर आदी शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेली भात पिके हत्तींच्या हल्ल्यामुळे चिरडली गेली आहेत.


सततच्या पावसामुळे आधीच पिकांचे नुकसान झाले असताना, आता या हत्तींच्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष पसरला आहे.




“वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला उमगाव भागातील हत्तींच्या हालचालींवर तातडीने नियंत्रण आणण्याचे आणि शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.


हत्तींच्या वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी सर्वसामान्यांची एकमुखी मागणी आहे.

Post a Comment

0 Comments