येत्या निवडणुका ताकदीनिशी लढणार – शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलगुडे
चंदगड (प्रतिनिधी): होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक चंदगड येथील राजवीर हॉटेल येथे जिल्हा प्रमुख माननीय विजयदादा बलगुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीच्या प्रारंभी उपजिल्हाप्रमुख बाबू नेसरकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
चंदगडचे माजी नगरसेवक व अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केलेले मा. बाळासाहेब हळदणकर यांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत जिल्हा प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. हळदणकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “चंदगड नगरपंचायतीवर भगवा फडकविण्याची तयारी पूर्ण झाली असून शिवसेनेचा विजय निश्चित आहे.”
युवानेते प्रताप उर्फ पिणू पाटील यांनी मनोगतात सांगितले की, चंदगड नगरपंचायतीसाठी बाळासाहेब हळदणकर यांना लागेल ती मदत देऊन संघटन बळकट करण्यात येईल. तसेच तुर्केवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण माननीय पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या उपस्थितीत तातडीने करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी जिल्हा प्रमुखांकडे केली.
तालुकाप्रमुख कल्लाप्पा निवगिरे म्हणाले, “नवीन जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात नवे चैतन्य आले आहे. आगामी निवडणुकीसाठी सर्व शिवसैनिक सज्ज झाले असून चंदगड ग्रामीण रुग्णालयात लवकरात लवकर डायलिसिस युनिट सुरू करण्यात यावे.”
जिल्हाप्रमुख विजय बलगुडे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “शिवसेना वाढीसाठी लागेल ती रसद पुरविण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो. पालकमंत्री आबिटकर साहेबांच्या माध्यमातून चंदगड तालुक्यात आरोग्यसेवा आणि विकास योजनांचा विस्तार करण्यात येईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “पंधरा दिवसांत पालकमंत्री साहेबांचा चंदगड दौरा आयोजित करून तुर्केवाडी आरोग्य केंद्र व डायलिसिस युनिटचे लोकार्पण करण्यात येईल. सर्व शिवसैनिकांनी एकदिलाने येत्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा.”
या बैठकीस प्रताप पाटील, बाळासाहेब हळदणकर, बाबू नेसरकर, कल्लाप्पा निवगिरे, किरण कोकीतकर, सुशांत नौकुडकर, दत्ता पाटील, वंदना सुभेदार, सुजाता कुंभार, सलीम मुल्ला, तेजस गावडे, अनिकेत सावंत, बाळू कडोलकर, यल्लाप्पा पाटील, बाळासाहेब नवलगे व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा आभार प्रदर्शन किरण कोकीतकर यांनी केले.

Post a Comment
0 Comments