भ्रष्टाचाराविरोधात संताप – कुद्रेमानी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या हकालपट्टीची जोरदार मागणी!
युवकांचा एल्गार — “न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील!”
कुद्रेमानी (प्रतिनिधी) :गावातील भ्रष्टाचार, मनमानी व अन्यायकारक कारभाराविरोधात कुद्रेमानी ग्रामपंचायतीसमोर आज युवकांचा तीव्र एल्गार उसळला! वाल्मिकी युवक संघटना, आंबेडकर संघटना आणि भ्रष्टाचार निर्मूलन संघटना (ACF) बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या मोर्चात ग्रामविकास अधिकारी (पी.डी.ओ.) यांच्या तात्काळ हकालपट्टीची मागणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीतील बेरोजगार युवकांनी पोल्ट्री, किराणा दुकान, काजू फॅक्टरी, रेशीम, वेल्डिंग, सुतार, लोहार, डेअरी व्यवसाय तसेच यशस्विनी (Y.S.T.) अनुदान योजना आणि घरकुल योजना यासाठी अर्ज केले होते. मात्र आवश्यक कागदपत्रे — एन.ओ.सी., घरचा कंप्यूटर उतारा, व्यवसाय परवाना इत्यादींसाठी १० ते ५० हजार रुपयांपर्यंत अवाजवी रक्कम वसूल केल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
याशिवाय एस.सी./एस.टी. घटकांच्या अनुदानाचा योग्य वापर होत नाही, तसेच रोजगार हमी योजनांमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अशीही मागणी नागरिकांनी केली. आज (५ नोव्हेंबर) काढण्यात आलेल्या धडक मोर्चात शेकडो नागरिक उपस्थित होते. मात्र संबंधित पीडीओ अधिकारी गैरहजर राहिल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी पसरली.
ग्रामपंचायत अध्यक्ष विनायक नारायण पाटील यांनी यावेळी सांगितले की, “मी केवळ पाच-सहा महिन्यांपूर्वी अध्यक्ष झालो आहे. अनेक तक्रारी माझ्याकडे येत आहेत, पण पीडीओ माझा फोनसुद्धा उचलत नाही. नागरिकांना न्याय मिळावा यासाठी लवकरात लवकर चौकशी केली जाईल.”
यावेळी ग्राम पंचायत सदस्य अरुण देवण, शांताराम पाटील आणि विमल साखरे उपस्थित होते.
तक्रारदारांनी भ्रष्टाचार निर्मूलन संघटना व ग्रामपंचायत अध्यक्षांकडे लेखी तक्रारी सादर केल्या. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी पीडीओंना अनेक वेळा फोन करून बोलावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे संघटनांनी संताप व्यक्त करत तालुका व जिल्हास्तरीय आंदोलनाचा इशारा दिला आहे.
“सर्व हिशोब सादर करून तक्रारींचे निरसन न झाल्यास, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू!” असा इशारा देण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व वाल्मिकी संघटना प्रमुख संजय कृष्णा तरवाळ व आंबेडकर संघटना एकनाथ कांबळे यांनी केले. त्यांनी सांगितले, “गावात नागरिकांच्या नावाखाली सुरू असलेली पैशांची लूट थांबवण्यासाठी दरफलक लावणे बंधनकारक करण्यात यावे —
घरचा कंप्यूटर उतारा ₹५०,
ना हरकत दाखला ₹५०,
हात उतारा ₹१०,
रहिवासी दाखला मोफत!”
तसेच व्यवसाय परवाना शुल्काचे सरकारी दर फलकावर नमूद करावेत, अशी मागणी करण्यात आली.
या मोर्चात अनिल जोतिबा पाटील, भरत धामणेकर, श्रीनाथ अशोक पन्हाळकर, गोपाळ चौगुले ,यल्लाप्पा नाईक (कुंडयेकर) , रायाप्पा नाईक, संदिप नाईक, सचिन नाईक ,महेश नाईक ,संजय के. तरवाळ , राजू नाईक, रमेश तरवाळ ,विठ्ठल तरवाळ ,चंद्रकांत तरवाळ , सिद्दाप्पा नाईक यांसह अनेक तक्रारदारांनी “आमच्याकडून पीडीओ आणि सदस्यांनी १० ते ५० हजार रुपये घेतले आहेत,” असे भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेला सांगितले.
मोर्चात वाल्मिकी आणि आंबेडकर संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्ये लक्ष्मण जानबा हरिजन, संदिप वसंत कांबळे , नामदेव मारुती कांबळे, विलास मारुती कांबळे, शिवाजी रामू कांबळे , विठ्ठल मलाप्पा कांबळे ,विलास मारुती कांबळे, राजू शटुप्पा कांबळे , भरमू धाकलू कांबळे , राकेश भरमू कांबळे , संतोष अर्जुन कांबळे ,यल्लाप्पा तरवाळ ,गोविंद तरवाळ , संदीप तरवाळ ,महेश अशोक नाईक , शिवाजी नाईक,सुधीर तरवाळ ,रमेश तरवाळ ,लक्ष्मण तरवाळ ,यल्लप्पा नाईक,ओंकार पी. तरवाळ ,मोहन एस. तरवाळ ,चंद्रकांत तरवाळ , महांतेश एम. तरवाळ,मारुती बी. तरवाळ ,यल्लाप्पा एस. तरवाळ ,निंगप्पा नाईक,आकाश नाईक ,महेश नाईक,बाबू नाईक,ईश्वर नाईक ,सागर नाईक,राजू नाईक,सुरेश नाईक,रवळू नाईक ,रामू नाईक,सचिन नाईक ,सुरेश पिटुक ,रामू पिटुक ,देवाप्पा नाईक,दयानंद नाईक,महादेव डी. नाईक,विठ्ठल नाईक ,संजय हिरेकर,कल्लव्वा भिमराव नाईक देवका तरवाळ, गोविंद हेमाणा तरवाळ ,संजय कृष्णा तरवाळ ,अक्षय तरवाळ ,स्वयंम तरवाळ ,यल्लुप्पा कृष्णा तरवाळ ,संजय वाय. तरवाळ ,बाळू गुंडू तरवाळ ,गुंडू मारुती तरवाळ ,सुरज तरवाळ ,ओंकार ईश्वर तरवाळ ,गोविंद तरवाळ ,पांडुरंग लोहार ,नारायण गुरव ,विठ्ठल धामणेकर ,सिध्दाप्पा नाईक,संजय गोविंद तरवाळ ,श्रीकांत शिवाजी तरवाळ ,रमेश तरवाळ ,परशराम रावजी तरवाळ ,महादेव तरवाळ ,परशराम के. नाईक,कल्लाप्पा नाईक ,संजय मष्णू तरवाळ,मल्लप्पा बळवंत नाईक,ईश्वर बळवंत नाईक ,नारायण तरवाळ व भरमाणा तरवाळ राजू कृष्णा तरवाळ असे कार्यकर्ते व तक्रारधारक उपस्थित होते .
कुद्रेमानी ग्रामपंचायतीसमोर आज भ्रष्टाचाराविरुद्धचा एल्गार पेटला असून, युवकांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे! 💪



Post a Comment
0 Comments