उद्या चव्हाटा यात्रेच्या पार्श्वभूमीवर कुद्रेमानीत श्री चव्हाटा मंदिराचे सुशोभीकरण
कुद्रेमानी (प्रतिनिधी) दि 4 : कुद्रेमानी पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री चव्हाटा देव मंदिराचे ग्रामस्थांच्या पुढाकारातून सुशोभीकरण करण्यात आले. गावाच्या वेशीवर वडाच्या झाडाखाली असलेल्या श्री चव्हाटा देव परिसरात झाडाच्या पानांमुळे व इतर कचऱ्यामुळे अस्वच्छता निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी मंदिर परिसराचे सुशोभीकरण केले.
उद्या, बुधवार दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सालाबादप्रमाणे श्री चव्हाटा देवाची यात्रा उत्सव साजरा होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व आकर्षक परिसर उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हे सुशोभीकरण करण्यात आले आहे.
सुशोभीकरणाच्या कामामध्ये मंदिराभोवती स्टील ग्रील उभारण्यात आली असून छतावर मजबूत प्लास्टिक शीट बसविण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसर सुरक्षित, स्वच्छ व आकर्षक झाला असून पाऊस आणि वडाच्या झाडावरील पानांपासूनही देवस्थानाचे संरक्षण होत आहे. यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली असून भाविक भक्तांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी वर्षीलदार धोंडीबा पाटील, वर्षीलदार शिवाजी गुरव, तसेच दीपक पाटील, रवी पाटील, सुरेश पाटील, विनायक पाटील, नाना पाटील, अरुण देवण, शंकर पाटील, बाळू कदम, पिंटू कागणकर, बाळू देवण, प्रकाश यळळूरकर, जोतिबा बडसकर , मधु पन्हाळकर , बाळू धामणेकर , परशराम आप्पाजी पाटील, परशराम काकतकर , रोहण शं. पाटील , महादेव मराठे , रामू पाटील , गावडू पाटील ,शिवाजी यल्लाप्पा गुरव , प्रकाश बिजगर्णीकर , संजय भिमराव पाटील, यल्लाप्पा काकतकर मेस्त्री , काशिनाथ देवण ,गोविंद पाटील सर , हणमंत पाऊसकर ,वामन कांबळे , परशराम कांबळे , यल्लाप्पा नाईक यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर सुशोभीकरणाचे काम कुशल कारागीर रघुनाथ कल्लाप्पा पाटील यांनी उत्कृष्टरीत्या पूर्ण केले. ग्रामस्थांच्या श्रमदान व सहकार्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य खुलून आले असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments